बर्फावर चालणे चांगलेच महागात पडले, तवांगमध्ये गोठलेल्या तलावात चार पर्यटक अडकले
हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशात सुट्टीची मजा घेण्यासाठी अनेक पर्यटक जम्मू-काश्मीर, शिमला, मनालीसह अरुणाचल प्रदेशला भेट देतात. अरुणाचल प्रदेशातील नयनरम्य पर्वत आणि तलाव पर्यटकांचे आकर्षण ठरतात. मात्र मजा करण्याच्या नादात पर्यटक नको ते साहस करतात आणि संकटात सापडतात. अशीच एक अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये घडली आहे. गोठलेल्या तलावात चालण्याची हौस चार पर्यटकांना चांगलीच महागात पडली आहे. गोठलेल्या तलावावर चालताना बर्फ तुटल्याने चार पर्यटक अडकले.
अरुणाचल प्रदेशातील सेला तलावात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतर पर्यटक अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अडकलेल्या चारही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
स्थानिक नागरिक आणि टुरिस्ट गाईड नेहमीच पर्यटकांना असे साहस न करण्याचे आवाहन करतात. धोक्याचा इशारा देतात. मात्र काही हौशी पर्यटक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अतिउत्साहामुळे संकटात अडकतात.
अरुणाचल प्रदेशात गोठलेल्या तलावात चालण्याची हौस चार पर्यटकांना चांगलीच महागात पडली आहे. गोठलेल्या सेला तलावावर चालताना बर्फ तुटल्याने चार पर्यटक अडकले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/nwbZhWr9IM
— Saamana Online (@SaamanaOnline) January 5, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List