मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे हा राजकीय जुमला होता का? संजय राऊत यांना भाजपला सवाल
केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा जाहीर करून तीन महिने झाले असले तरी अद्यापही त्याचे अधिकृत पत्र अथवा केंद्राचा त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे हा राजकीय जुमला होता का? असा सवाल देखील त्यांनी केला.
”विधानसभा निवडणूकीच्या मराठी लोकांची मतं मिळवण्यासाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा भाजपने केली. आम्ही कसे मराठी भाषेचे तारक, संरक्षक आहोत याचे ढोल त्यांनी पिटले. प्रत्यक्षात अजूनही सरकारी आदेश निघू शकलेला नाही. महाराष्ट्रात जे सरकार आहे त्याबाबत वेगाने हालचाल करतंय असं दिसत नाही. काही संस्था संघटना पाठपुरावा करतायत. पण ज्यांनी ही घोषणा केली दिल्लीतून. पंतप्रधानांनी ट्विटरवरून जाहीर केलं. त्यानंतर इथल्या मंत्र्यांनी पेढे वाटले. मग हा राजकीय जुमला होता का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. ”मराठी भाषेसोबत आणखी काही भाषांना दर्जा मिळाला होता. त्यातील काही भाषांबाबत जीआर निघाला आहे. मात्र मराठी भाषेबद्दल अध्यादेश निघालेला नाही. त्याबाबत अजुनही नैराश्य आहे, असेही ते म्हणाले.
”एका व्यंगचित्रकाराल नोटीसा पाठवल्या, आम्ही लिहत होतो बोलत होतो म्हणून आम्हाला तुरुंगात टाकलं. या देशाला व्यंगचित्राची फार मोठी परंपरा आहे. शंकर, आर के असतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील. शिवसेनाचाच जन्म मूळात व्यंगचित्रातून झाला आहे. हिटलरला सुद्धा आव्हान देणारा डेव्हिड लो होता. पण या देशात सरकारविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जातंय. ते हिटलरच्या काळात होतं. हिटलरने डेव्हिड लो ला जिवंत किंवा मुडदा पकडण्याचे आदेश दिले होते. आपल्या देशात वेगळं या पेक्षा वेगळं काही घडत नाहीए. भाजपला जर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची चिंता असेल तर त्यांनी व्यंगचित्रकारांसदंर्भात भूमिका घ्यावी, असे संजय राऊत म्हणाले.
”छत्तीसगढमध्ये एका पत्रकाराची हत्या झाली. त्या पत्रकाराने तिथला भ्रष्टाचार समोर आणलेला. कसं रोडचं बिल वाढून कोट्यावधी रुपये खात्यात घ्यायचे असे प्रकार त्याने उघड केले. मुकेश चंद्राकारची हत्या ही संतोष देशमुखसारखीच आहे. संतोष देशमुख यांनी अन्याय आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येचा आका मंत्रीमडंळात बसलाय. तशी झारखंडमध्ये रुपेश सिंग नावाचा तरणपत्रकार आहे. तिथे जंगलात जो भ्रष्टाचार होतो त्याविरोधात आवाज उठवला त्याला दोन तीन वर्षांपासून तुरुंगात डांबलंय. हे पूर्ण देशात सुरू आहे. आणि भाजपवाले बोलतात इथे लोकशाही आहे, ही कसली लोकशाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List