Atul Subhash Case – पत्नी निकितासह कुटुंबीयांना जामीन; आम्हाला नातवाची काळजी, अतुल सुभाषच्या वडिलांनी व्यक्त केली चिंता
बंगळुरू येथील AI इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे सारा देश हादरून गेला होता. सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. याप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि पत्नीचा भाऊ अनुराग सिंघानिया यांना पोलिसांनी अटक केले होते. परंतु शनिवारी तिघांनाही बंगळुरुच्या सिटी सिव्हिल कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे अतुल सुभाषच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त करत नातवाची काळजी वाटत असल्याचे म्हंटल आहे. तसेच नातु कुठे आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
“आम्हाला कर्नाटक पोलिसांनी नातवाबद्दल माहिती दिली आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की, नातू फरीदाबादमध्ये बोर्डिंग स्कुलमध्ये आहे. तीन वर्षांचा असताना त्याला बोर्डिंग स्कुलमध्ये दाखल करण्यात आले असून हे बेकायदेशीर आहे. मुलाचे वय आता चार वर्ष आहे. जानेवारी 2024 मध्ये त्याला तीन वर्षांपेक्षा कमी वय असताना बोर्डिंग स्कुलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याला वडिलांचे नावही देण्यात आलेले नाही. वडिलांच्या जागी आईचा फोटो लावण्यात आला आहे. निकीताला मुलाविषयी जराही प्रेम नाही. फक्त पैसे हडपण्यासाठी ATM सारखं त्याचा वापर करत आहे. आत्तापण तिने मुलाचा वापर करून जामीन मिळवला आहे, असा आरोप अतुल सुभाषच्या वडीलांनी केला आहे.
“आम्ही निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जामीन आदेशाविरोधात उच्च न्यायालायच जाणार आहे. तसेच गरज पडल्यास सुप्रीम कोर्टातही जाऊ, असे अतुल सुभाष यांचा भाऊ विकास मोदी म्हणाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List