स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा छापण्यात आला होता फोटो
आज हिंदुस्थानातील सर्व चलनांवर आपल्याला महात्मा गांधी यांचा फोटो असल्याचं पाहायला मिळतं. मात्र स्वतंत्र हिंदुस्थानात जेव्हा पहिल्यांदा नोट छापण्यात आली, त्यावेळी यावर कोणाचा फोटो छापण्यात आला होता, हे तुम्हाला माहित आहे का? यातच आज आपण जाणून घेणार आहोत की, स्वतंत्र हिंदुस्थानात आरबीआयने (RBI) सर्वातआधी कोणती नोट छापली आणि त्याची किंमत किती होती…
भारतीय रिझर्व्ह बँकची (RBI) स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच झाली होती. आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली आणि पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापनेनंतर तीन वर्षांनी जानेवारी 1938 मध्ये पहिल्यांदा 5 रुपयांची नोट जारी केली होती. या नोटेवर ‘किंग जॉर्ज सहावा’ यांचे फोटो छापण्यात आले होते.
मात्र प्रश्न असा आहे की, स्वातंत्र्यानंतर आरबीआयने जारी केलेली पहिली नोट कोणती होती? तर स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिली चलनी नोट 1 रुपया होती, जी रिझर्व्ह बँकेने 1949 साली जारी केली होती. त्यावेळी किंग जॉर्जच्या फोटोऐवजी सारनाथ येथील अशोकस्तंभावरील सिंहाचे चिन्ह 1 रुपयाच्या नोटेवर छापण्यात आले होते. पुढे रिझर्व्ह बँकेने 1969 मध्ये पहिल्यांदा गांधीजींच्या फोटोसह 100 रुपयांच्या नोटा जारी केल्या होत्या. तेव्हापासून हिंदुस्थानी नोटांवर गांधीजींचे फोटो छापले जात आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List