कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन संपन्न, पुरुषांमध्ये अभिषेक देवकाते तर महिलांमध्ये रजनी सिंग यांची बाजी
सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वात 21 किमी मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये अभिषेक देवकाते आणि महिलांमध्ये रजनी सिंग यांनी बाजी मारली. तब्बल 1600 स्पर्धकांनी 5, 10 आणि 21 किमी धावण्याच्या या स्पर्धेत भाग घेऊन आनंदोत्सव साजरा केला.
गेल्या वर्षी प्रथमच कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यंदा रन फॉर बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना घेऊन ही स्पर्धा घेण्यात आली. रविवारी सकाळी मथुरा हॉटेलजवळील मैदानावर झुंबा डान्सने वॉर्म अपला सुरवात झाली. रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली होती. याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे बहुमोल सहकार्य लाभले.
सर्व गावांमधील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे वाजवून या धावपटूंचे जल्लोषात स्वागत केले. अमेरिका, इंग्लंडसह हिंदुस्थानातील 85 शहरांतून 1600 जणांनी नोंदणी केली होती. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे मोलाचे सहकार्य लाभले.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक सूर्यकांत देवस्थळी व सौ. सुवर्णा देवस्थळी आणि अध्यक्ष प्रसाद देवस्थळी यांच्या उपस्थितीत स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
२१ किलोमीटरसाठी धावपटू वेगाने धावू लागले. नाचणे, शांतीनगर, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोप या वळणे, चढावाच्या मार्गावरून धावताना धावपटूंची मेहनत दिसून आली. वाटेत विविध ठिकाणी ग्रामपंचायत व अनबॉक्सने हायड्रेशन पॉईंटची व्यवस्था केली होती.
सकाळी 6.50 वाजता 10 किमी आणि 7.20 वाजता 5 किमीसाठी स्पर्धा सुरू झाली. वाहतूक पोलिसांनी अतिशय उत्तम नियंत्रण केले होते. स्पर्धेला रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, रत्नागिरी नगरपालिका, अनबॉक्स उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा ः
21 किमी
16 ते 35 वयोगट- पुरुष- अभिषेक देवकाटे, सिद्धेश बिर्जे, सौरभ रावणंग
महिला – सुरभी सावर्डेकर, केतकी घाडगे, सीमा जामदार
36 ते 45 वयोगट- पुरुष- कपिल शर्मा, दादासो सातरे, सिद्धार्थ भागव.
महिला – रजनी सिंग, योगिता पाटील, मनीषा भारद्वाज.
46 ते 55 वयोगट- पुरुष- जयंत शिवडे, अनंत तानकर, सागर घोले.
महिला – मानसी मराठे, सीमा बिजू, अपर्णा प्रभूदेसाई
56 ते 65 वयोगट- पुरुष- सुरेश वेलणकर, विश्वनाथ शेट्ये, सीताराम उत्तेकर.
महिला – दुर्गा हिमांशू कुमार सिल, रम्या नारायण, सुभाषिणी श्रीकुमार
65 वर्षांवरील गट- पुरुष- हेमंत भागवत, रजापान पी. पी., जगदीश जोशी.
महिला – लता आलिमचंदानी
10 किमी
16 ते 35 वयोगट- पुरुष- ओंकार बैकर, आदित्य धुळप, सिद्धेश मायंगडे.
महिला – श्रृती दुर्गवळी, सीमा राठोड, युगंधरा मांडवकर.
36 ते 45 वयोगट- पुरुष- संदीप पवार, अमित कुमार, दीपक वार्पे.
महिला – श्वेता कुमारी, मनस्वी गुडेकर, विनया गुजर.
46 ते 55 वयोगट- पुरुष- हितेंद्र चौधरी, बिपीन मोरे, राजेंद्र पवार.
महिला – निशिगंधा नवरे, ज्ञानेश्री जोशी, सायली निकम.
56 ते 65 वयोगट- पुरुष- अतुल बांदिवडेकर, यशवंत परब, विनय प्रभू
महिला – योगिता गुप्ता, निर्मला काळे, मधुरा चिंचाळकर.
65 वर्षांवरील गट- पुरुष- रोहित गुरव, सतीश दीपनायक, शिरीष देवस्थळी.
महिला- प्रतिभा मराठे.
5 किमी
16 ते 35 वयोगट- पुरुष- दिपेश दिलीप, युवराज गावडे, ओंकार नले.
महिला – रेणुका कुमारी, शीतल गावडे, आराध्य धुळप
36 ते 45 वयोगट- पुरुष- उमेश खेडेकर, सुरेंद्र बंडबे, नीलम कांदे.
महिला – सोनाली आयरे, सविता जगदाळे, तन्वी साळुंखे.
46 ते 55 वयोगट- पुरुष- गणेशसिंग रजपूत, स्वप्नील साळवी, सचिन दाभोळकर.
महिला – मंजिरी गोखले, वैदही कदम, रेश्मा मोंडकर.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List