मतदारांपेक्षा वेश्या बऱ्या, मिंधेंच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
महायुतीचे सरकार स्थापन होऊन काहीच महिने झालेले असताना मिंधे गटाच्या आमदारांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेल्याच पाहायला मिळत आहे. मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांची तुलना थेट देहविक्री करणाऱ्या महिलांशी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे बोलताना ते म्हणाले की, ”दोन हजारात मतदार विकले गेले”. विधानसभा निवडणुकीत त्यांना कमी मतदान झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. यावेळी त्यांनी मतदारांना शिव्या देत अवमानजनक शब्दांचा वापर देखील केला.
काय म्हणाले संजय गायकवाड?
जयपूर येथे बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही. तुम्हाला फक्त फक्त दारू, मटण, पाचशे रुपये पाहिजे. मतदार दोन दोन हजारात विकले, असं म्हणत त्यांनी मतदारांना शिवीगाळ केली. तसेच यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या, असं आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केलं. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List