शेअर बाजार संकटात? परकीय गुंतवणूकदारांकडून 3 सत्रात तब्बल 4285 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री

शेअर बाजार संकटात? परकीय गुंतवणूकदारांकडून 3 सत्रात तब्बल 4285 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री

नवे वर्ष सुरू झाल्यावर शेअर बाजार गेल्या वर्षातील मरगळ झटकून पुन्हा तेजीत येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसात बाजाराने थेडी तेजीची दिशी पकडली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी बाजार पुनहा घसरला. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजारात घसरण झाली. त्यामुळे बाजारात अजूनही अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यातच परकीय गुतंवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारातील पैसे रकाढून घेतल्याने देशातील बाजारावर संकट असून त्याचे परिणाम दिसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून परकीय गुंतवणूकदार सातत्याने बाजारातून पैसे काढून घेत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात तेजीने झाली होती. पण, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी वाजारात पुन्हा घसरण झाली. अनेक कंपन्या लवकरच त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. त्याआधी परकीय गुंतवणूकदारांनी (FPI) बाजारातील आपले पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात नफावसुली होत असल्याने बाजारात घसरण दिसत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून केवळ 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये 4,285 कोटी रुपये काढले आहेत. डिसेंबर महिन्यात FPI ने शेअर्समध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर आता नफावसुली करत परकीय गुतंवणूकदार बाहेर पडत आहेत.

अमेरिकन डॉलर मजबूत राहील आणि अमेरिकन बाँडचे उत्पन्न चांगले राहील, तोपर्यंत एफपीआयकडून विक्री सुरू राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाही निकालापूर्वी सावध होत आहेत. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे FPI भावना कमकुवत झाली आहे. याशिवाय, यूएस फेडरल रिझर्व्हकडून यावर्षी व्याजदरात कपात करण्याचे कमी संकेत आहेत, त्याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. आगामी काळत परकीय गुतंवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्यास बाजारात आणखी घसरण दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल
Mumbai Torres Jewellery Scam : मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील दादर...
अंधेरीत इमारतीला भीषण आग, 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत गुरुमाच्या एण्ट्रीने खळबळ; ठाकूरांच्या घरी अचानक अवतरणारी ही व्यक्ती कोण?
दीड वर्षांतच दुसऱ्यांदा आई बनली सना खान; धर्माचं कारण देत सोडलं होतं बॉलिवूड
शुभमन गिलसोबतच्या नात्यावर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन; म्हणाली “माझ्या कुटुंबीयांना..”
सरकारने निधी अडवला; पालघरचे सिव्हिल, ट्रॉमा केअर सेंटर व्हेंटिलेटरवर, प्रशासनाविरोधात स्थानिकांचा संताप
अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते, भाजपच्या ईव्हीएममुळे त्यांना जागा मिळाल्या; संजय राऊत यांचा घणाघात