दुबईहून उड्डाण घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे केरळमध्ये एमर्जन्सी लँडिंग
दुबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे केरळमधील विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील कारीपूर विमानतळावर विमान उतरवण्यात आले. वैमानिकाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड झाल्याने विमानाच्या लँडिंगचा निर्णय घेण्यात आला.
एअर इंडियाचे फ्लाइट IX344 हे सकाळी साडेआठ वाजता करीपूर विमानतळावर उतरवण्यात आले. तत्पूर्वी या विमानतळावर इमर्जन्सी घोषित केली होती. विमान उतरल्यानंतर इमर्जन्सी हटवण्यात आली. विमानातील हायड्रॉलिक सिस्टीम कशी बिघडली याबाबत तपास सुरू आहे.
विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 182 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. त्यांची सुरक्षितता लक्षात घेत विमानाचे लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. इमर्जन्सी लँडिंगसाठी आवश्यक व्यवस्था विमानतळावर करण्यात आली होती. रुग्णवाहिका आणि अग्निशमन सेवा सज्ज ठेवण्यात आली होती. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List