High Court News – विवाहित व्यक्तीचे सहमतीने संबंध म्हणजे दुसरं लग्न केल्यासारखचं, जोडप्याला सुरक्षा पुरवण्यास उच्च न्यायालयाचा नकार

High Court News – विवाहित व्यक्तीचे सहमतीने संबंध म्हणजे दुसरं लग्न केल्यासारखचं, जोडप्याला सुरक्षा पुरवण्यास उच्च न्यायालयाचा नकार

विवाहित व्यक्तीने परस्त्रीशी सहमतीने संबंध ठेवणे म्हणजेच एक प्रकारे दुसरे लग्न केल्यासारखे आहे, असे म्हणत पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने एका जोडप्याने दाखल केलेली सुरक्षेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आणि त्यांना फटकारले. याचिकाकर्ता विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. असे असताना अशा प्रकरणांमध्ये जर संरक्षण देण्यात आले तर समाजात चुकीचा पायंडा पडेल, असा दमही न्यायालयाने भरला.

न्यायमूर्ती संदीप मौदगीन यांनी याप्रकरणी निर्णय देत एका जोडप्याची सुरक्षेची मागणी करण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. त्यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 अंतर्गत नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. परंतु त्याचे उल्लंघन होता काम नये, तसेच या अधिकाराचे कायद्याच्या चौकटीत राहून पालन केले पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये याचिका स्वीकारल्या गेल्या तर दुहेरी विवाह सारख्या चुकीच्या प्रथांना प्रोत्सोहान दिल्या सारखे होईल. भारतीय दंड संहितेच्या कलम 497 अतंर्गत दुहेरी विवाह कायद्याने गुन्हा आहे.

अशा प्रकरणांचे समर्थन केले गेले, तर विवाहित व्यक्तीने ज्या व्यक्तीशी लग्न केले आहे. त्या व्यक्तीच्या सम्नानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे उल्लंघन होईल. लग्न हे एक पवित्र बंधन असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली. पश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण केल्यास हिंदुस्थानी संस्कृतीच्या मुल्यांवर नकारात्मक प्रभाव पडेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणीही स्वत:च्या स्वार्थासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचा चुकीचा वापर करून समाजात गढुळता निर्माण करू शकत नाही, असे न्यायालयाने सुनावले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स...
पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख
मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक
मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या
मुंबई विमानतळावर गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; बँकॉकहून आलेल्या केरळच्या प्रवाशाला अटक