प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आजपासून तिकीट

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आजपासून तिकीट

26 जानेवारी रोजी कर्तव्यपथावर 90 मिनिटांचे संचलन (परेड) असते. त्यातून राष्ट्राच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. टीव्हीवरून परेड पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष कर्तव्यपथावर जाऊन हे क्षण अनुभवावे असे अनेकांना वाटते. कोविडनंतर परेडची तिकीट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने खास वेबसाईट विकसित केलेय. या वेबसाईटवर 2 जानेवारीपासून तिकीट मिळवता येतील.  तिकीटाची किंमत 20 रुपये, 100 रुपये आहे. तिकीटांची संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक दिवशी ठराविक तिकीटांची विक्री होईल. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना ‘ स्वर्णिम भारत- विकास आणि वारसा’ अशी  आहे.  यंदा पाच हजार कलावंत देशाचा विकास, वारसा आणि संस्कृतीची झलक दाखवतील. एकूण 25 चित्ररथ असतील. वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांसह माजी सैनिक, डीआरडीओ, आसाम रायफल्स, कोस्ट गार्डचे शानदार प्रदर्शन होईल.

तिकीट कसं काढायचं?

अधिकृत वेबसाइट aamantran.mod.gov.in वर जावे लागेल.   तिथे `Book your ticket here’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर  `Register to Book Ticket’ वर क्लिक करून नाव भरावे. मोबाइल नंबर टाकून `Request OTP’ वर क्लिक करावे. रजिस्टरवर क्लिक करून लॉगिन करावे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून स्वतःसाठी, इतरांसाठी परेडचे तिकीट बुक होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी प्रशिक्षण वर्ग, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून आयोजन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार न्यु इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमधील असिस्टंट पदासाठी आणि स्टेट बँक ऑफ इंडियामधील ज्युनियर असोसिएट्स...
पोखरण अणुचाचणीचे शिल्पकार डॉ. आर. चिदंबरम यांचे निधन
महत्त्वाचे: भ्रष्टाचार उघड केला म्हणून पत्रकाराची हत्या
केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख
मांजर लपवली म्हणून पाच वर्षाच्या मुलीसोबत अमानुष कृत्य, शेजारणीला अटक
मेघालयातील ‘या’ सुंदर गावांना भेट द्या, जाणून घ्या
मुंबई विमानतळावर गांजाच्या तस्करीचा पर्दाफाश; बँकॉकहून आलेल्या केरळच्या प्रवाशाला अटक