दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
दाक्षिणात्य अभिनेता, ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनला आज न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने अल्लू अर्जुनला प्रत्येकी 50,000 रुपयांचे दोन हमीदार सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शो दरम्यान अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. यावेळी चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा 8 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List