दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष अटकेपासून बचावले, 200 सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना घरात घुसू दिले नाही
दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना आज अटक करता आली नाही. योल यांनी 3 डिसेंबर रोजी देशात मार्शल लॉ लागू केल्याबद्दल त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागले. कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. त्यानुसार आज पोलिस त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. परंतु, योल यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या सुमारे 200 सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना गेटवरच अडवले.
यावेळी यून यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते.राष्ट्राध्यक्षांच्या अटकेबाबत तब्बल 6 तास गदारोळ सुरू होता परंतु, पोलिसांना योल यांना अटक करता आली नाही. योल यांना 6 जानेवारीपर्यंत अटक करण्याचे वॉरंटआहे. यानंतर त्यांच्या अटकेसाठी नवीन वॉरंट काढावे लागणार आहे.
150 पोलीस योल यांच्या घरी
योल यांना अटक करण्यासाठी डझनभरपोलिस बस आणि अनेक अधिकारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले होते. पोलिस अधिकारी आणि भ्रष्टाचार तपास कार्यालयाचे 20 सदस्य घराच्या दिशेने निघाले. निदर्शने वाढत असल्याचे पाहून आणखी दीडशे पोलिस त्याठिकाणी आले. यातील अनेक पोलिस संकुलात घुसले, तरीही त्यांना लष्कर आणि आंदोलकांच्या विरोधकाचा सामना करावा लागला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List