सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध
अकोला, 21 डिसेंबर : मानसिक आरोग्य ही आजच्या काळात एक महत्त्वाची समस्या ठरत आहे. अनेकांना मानसिक आजारांवर योग्य उपचार मिळत नाहीत किंवा आर्थिक अडचणींमुळे ते उपचार घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत सन्मित्र मानस हॉस्पिटल आणि रिहॅब सेंटर, अकोला यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना मानसिक आजारांवर दर्जेदार आणि मोफत उपचार घेण्याची संधी मिळणार आहे.
सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार दिले जात आहेत. त्यामध्ये मारपीट करणे, बडबड करणे, गंभीर मानसिक समस्या, उदासीनता, चिंता, सतत हात धुण्याची सवय (OCD), डोकेदुखी (मायग्रेन), आकडीचे झटके (सफट्स), फोबिया आणि भ्रम यांसारख्या आजारांचा समावेश आहे. पेशंट भरती असतांना औषधे, गोळ्या, रक्त तपासणी, राहणे, खाणे पिणे, शॉक ट्रीटमेंट इत्यादी कोणताही खर्च लागत नाही हे सर्व उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जात असल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक RTMS तंत्रज्ञानाचा वापर करून काही गंभीर मानसिक आजारांवर उपचार केले जात आहेत. रिपेटिटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (RTMS) ही एक नॉन-इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती असून ती उदासीनता, चिंता, OCD आणि धूम्रपानाच्या सवयीवर प्रभावी ठरते. RTMS तंत्रज्ञानामुळे मेंदूतील पेशी सक्रिय होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. विशेषतः उपचार-प्रतिरोधक (ट्रीटमेंट रेसिस्टंट) असलेल्या डिप्रेशनवर या तंत्रज्ञानाने ५० ते ६० टक्के यशस्वी परिणाम साध्य होतात. अमेरिकेच्या FDA मान्यतेने हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे.
सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना कोणत्याही अडचणीशिवाय मोफत उपचार उपलब्ध होतील. सन्मित्र मानस हॉस्पिटल, रवीदास प्लॉट, अकोला येथे केळकर हॉस्पिटलजवळ हे उपचार केंद्र कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी +९१ ७०३०४१४१४० किंवा +९१ ८८०५०९७२२७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, अधिक माहिती व अपडेट्ससाठी हॉस्पिटलची अधिकृत वेबसाइट learn.mmdrkelkar.com तसेच डॉ. केळकर यांचा यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन्मित्र मानस हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन आयुष्याकडे सकारात्मक पाऊल टाका. मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे आणि सन्मित्र मानस हॉस्पिटल तुमच्यासोबत आहे, तुमच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List