लक्षवेधी – ‘ब्लिंकिट’ची 10 मिनिटांत अॅम्ब्युलन्स सेवा
किराणा सामानापासून कोणतीही वस्तू अवघ्या काही मिनिटांत पोहोचवणाऱ्या ‘ब्लिंकिट’ या कॉमर्स प्लॅटफॉर्मने आता 10 मिनिटांत अॅम्ब्युलन्स सर्व्हिस सुरू केली. गुरुवारपासून गुरुग्राममध्ये या सेवेचा शुभारंभ झाला. गुरुग्राममध्ये पहिल्या टप्प्यात पाच रुग्णवाहिकांसह ही सेवा सुरू झाली. येत्या दोन वर्षांत देशातील प्रमुख शहरांमध्ये 10 मिनिटांत अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचे ब्लिंकिटचे उद्दिष्ट आहे.
शिमल्यात 104 वर्षे जुने आईस स्केटिंग रिंक खुले
शिमला येथे ऐतिहासिक आईस स्केटिंग रिंक आहे. 104 वर्षे जुना असा हा आईस स्केटिंग रिंक आहे. यंदाच्या मौसमात रिंक खुला झाला आहे. आईस स्केटिंग रिंकचे सदस्य अर्जुन कुटियाला म्हणाले, साधारण दहा वर्षांपूर्वी हिवाळ्यात 100 ते 110 स्केटिंग सत्र आयोजित करायचो. मात्र आता ग्लोबल वार्ंमग आणि बदलत्या हवामानामुळे स्केटिंग सत्रांची संख्या कमी होऊन 50 ते 55 सत्र एवढी झाली आहे.
अॅपलकडून 9.5 कोटी डॉलर्सची नुकसानभरपाई
अॅपलच्या उत्पादनातच वापरकर्त्यांच्या खासगी संभाषणांचा गैरवापर झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पंपनीला नुकसानभरपाईसाठी ठरवण्यात आलेली 95 मिलियन डॉलर्स म्हणजेच साधारणपणे 9.5 कोटी डॉलर दंडाची रक्कम अदा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तक्रारदार वापरकर्त्यांना प्रत्येकी सुमारे 20 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 1700 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
आरटीजीएस, एनईएफटी होणार सुरक्षित
आरटीजीएस आणि एनईएफटी करताना आता चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत. कारण अशा पद्धतीने पैसे पाठवताना लाभार्थ्याचे नाव पाहता येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. या सुविधेमुळे ग्राहकांना पैसे पाठवण्यापूर्वी ते योग्य लाभार्थ्यालाच पाठवले आहेत का याची खात्री करता येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List