दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले आहेत. शहरातील रूपनगर परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. स्फोटामुळे शेजारील खोल्यांचेही नुकसान झाले आहे. अविनाश शिर्के आणि आश्विनी शिर्के अशी जखमी पती-पत्नीची नावे आहे.
जखमी पती-पत्नीवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलवण्यात आले आहे. घटनेवेळी पती-पत्नी दोघेच घरी होते. मुलं शाळेत गेली असल्याने सुदैवाने ती या दुर्घटनेतून बचावली आहेत.
सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने स्फोट झाला. घरात आग लागून साहित्य जळाले. खिडकीची ग्रील निखळून पडल्याने चारचाकी गाडीचेही नुकसान झाले. तसेच दाराजवळची भिंत शेजारच्या घरावर पडल्याने त्यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरपर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List