सुपर अॅप 2024 मध्ये ‘या’ स्किन केअर गैरसमजांना करा बाय-बाय
Skin Care Myths : स्किनकेअरचा विचार केला जातो तेव्हा लोक यासाठी अनेक पद्धतींचा वापरतात. याच्याशी संबंधित काही मिथक किंवा गैरसमजही आहेत. यामुळे अनेकदा त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे नवेवर्ष येण्यापूर्वीच असे गैरसमज दूर करा. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.
त्वचा चमकदार आणि निरोगी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक स्किनकेअर रूटीन फॉलो करतात. यासाठी बाजारात अनेक प्रकारची स्किन केअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. तेलकट, कोरडे ते संवेदनशील अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्पादने बाजारात उपलब्ध असतील.
त्वचेची काळजी घेण्यासाठी क्लिंज, टोनर, स्क्रब, फेस मास्क आणि मॉइश्चरायझरचे अनेक मार्ग आहेत. त्वचा घट्ट करण्यासाठी अनेक जण चेहऱ्यावर मसाज करतात.
लोक रोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. उत्पादने आणि पद्धती वेगवेगळ्या त्वचेचे प्रकार आणि ऋतूनुसार भिन्न असतात. हल्ली लोक त्याकडे खूप लक्ष देतात. परंतु स्किनकेअरशी संबंधित अनेक मिथक किंवा गैरसमज आहेत. जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सनस्क्रीन फक्त उन्हाळ्याच्या महिन्यांतच आवश्यक?
सनस्क्रीनचा वापर उन्हाळ्यातच करावा, असे अनेकांचे मत आहे. पण सनस्क्रीनचा वापर प्रत्येक ऋतूत करावा. अतिनील किरणांमुळे उन्हाळ्या व्यतिरिक्त पावसाळा आणि हिवाळ्यात त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हवामान काहीही असलं तरी घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करा.
महागडी स्किनकेअर उत्पादने नेहमीच चांगली असतात?
महागडी उत्पादने नेहमीच सर्वोत्तम नसतात. स्किनकेअरसाठी योग्य अशी अनेक परवडणारी उत्पादनंही बाजारात उपलब्ध आहेत. स्किनकेअर रूटीनचा परिणाम आपल्या त्वचेच्या गरजांवर अवलंबून असतो आणि उत्पादनाच्या किंमतीवर नाही. योग्य त्वचेची काळजी घेणारी उत्पादने निवडणे त्वचेच्या प्रकारावर आणि समस्येवर आधारित असले पाहिजे, त्याच्या किंमतीवर नाही.
अधिक स्क्रबिंग त्वचेसाठी फायदेशीर?
स्क्रबिंगमुळे त्वचेतील घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत होते. पण जर तुम्ही जास्त स्क्रबिंग केले तर यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने त्वचेची जळजळ आणि सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल देखील काढून टाकले जाऊ शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हलक्या हातांनी हलका वजनाचा स्क्रब करणे योग्य ठरते.
चेहऱ्यावर ऑईल फ्री क्रीम लावावी?
ज्या लोकांची त्वचा अधिक तेलकट आहे त्यांनी तेल-मुक्त आणि जेल-आधारित क्रीम वापरावे. त्वचेचे काही प्रकार, विशेषत: कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि तेल-आधारित त्वचेची काळजी घेणारी उत्पादने देखील आवश्यक असतात. पण त्याचा वापर योग्य प्रमाणात आणि पध्दतीने व्हायला हवा. हे आपल्या त्वचेवर आणि आपल्याला क्रीम, तेल किंवा जेल मॉइश्चरायझर वापरावे की नाही या समस्येवर निर्धारित केले जाते.
फक्त चेहऱ्याची काळजी घेणं गरजेचं?
स्क्रबपासून मॉइश्चरायझरपर्यंत बहुतेक लोक चेहऱ्याची खूप काळजी घेतात. पण स्किनकेअर फक्त चेहऱ्यापुरती मर्यादित नाही, तर हात, पाय आणि ओठ या सगळ्यांना योग्य स्किनकेअरची गरज असते. उदाहरणार्थ, मॉइश्चरायझर केवळ चेहऱ्यावरच नव्हे तर पाय, हात आणि मानेभोवती देखील लावावे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List