दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होणार! मोठी अपडेट समोर
ऐन कडाक्याच्या थंडीत दिल्लीतले राजकारण तापले आहे. याचे कारण दिल्ली विधानसभा निवडणूक आहे. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट आली आहे. पुढच्या आठवड्यात 7-8 जानेवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल आणि 15 फेब्रुवारीला निकाल लागेल, असे सांगण्यात येत आहे.
दिल्लीत 11-13 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. मतमोजणी 15 किंवा 16 फेब्रुवारीला होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूणच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीत 6 जानेवारीला म्हणजेच येत्या समोवारी मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे. यानुसार फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्लीत नव्या सरकारचे चित्र स्पष्ट होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List