जसप्रीत बुमराहने रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला हिंदुस्थानी गोलंदाज
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच भ्रमास्त्र जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये जसप्रीत बुमराह गरुड झेप घेत ‘नंबव वन’च्या सिंहासनावर कब्जा केला आहे. त्याच बरोबर त्याच्या नावावर विक्रमी 907 गुण जमा झाले आहेत.
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा जसप्रीत बुमराह पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सर्वात अव्वल गोलंदाज म्हणून त्याने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. बॉर्डर गावस्कर करंडकातही त्याच्या गोलंदाजीचे जलवे पहायला मिळाले. त्याने कंगारूंच्या पायला अगदी परफेक्ट चाप लावला होता. त्याने पाच सामन्यांमध्ये 12.83 च्या सरासरीने 30 फलंदाजांना बाद केले होते. त्याचाच फायदा त्याला ताज्या क्रमवारीत झाला असून त्याच्या खात्यात विक्रमी 907 गुणांची भर पडली आहे.
जसप्रीत बुमराह सर्वाधिक 907 रेटींग्सची कमाई करणारा पहिला हिंदुस्थानी गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता. त्याने डिसेंबर 2016 साली सर्वाधिक 904 गुणांची कमाई केली होती. त्याच बरोबर बुमराह आता 907 रेटींग्ससह आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या यादीमध्ये 17 व्या क्रमांकावर पोहचला आहे. सर्वाधिक रेटींग्सच्या यादीमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सिडनी बार्न्स (932) आणि जॉर्ज लोहमन (931) पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत तसेच तिसऱ्या क्रमांकावर इम्रान खान (922) आणि चौथ्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन (920) यांचा समावेश आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List