खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला, आठ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला, आठ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू

घराबाहेर खेळत असताना चुकून पाण्याच्या टाकीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. सचिन जनबहादूर वर्मा असे मयत मुलाचे नाव आहे. घाटकोपरमधील पंतनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पंतनगर येथील शांतीनगर सोसायटीत शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आठ वर्षीय सचिन हा घराबाहेर खेळत होता. खेळताना तो चुकून पाण्याच्या टाकीत पडला आणि बुडाला. मुलाच्या वडिलांनी आणि स्थानिकांनी त्याला तात्काळ बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आज ममता दिन आज ममता दिन
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 94 वा जन्मदिन म्हणजेच ममता दिन 6 जानेवारी रोजी साजरा होत...
पुण्यात जनआक्रोश; खंडणीसाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाली बैठक! संतोष देशमुख हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला
लाडक्या बहिणींचा तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफी आता शक्य नाही! कृषिमंत्र्यांनी हात वर केले
मतं दिलीत म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झालात, अजितदादांचा बारामतीकरांना दम
दिल्ली डायरी – केजरीवालांचा ‘नवहिंदुत्वा’चा ‘घंटानाद…!’
मेघना कीर्तिकर यांचे निधन
विज्ञान-रंजन – वार्षिक पाहुणे