भोपाळमध्ये आयकर विभागाची कारवाई, कारमध्ये आढळले 52 किलो सोने आणि 9 कोटी रोकड
भोपाळमध्ये आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये 52 किलो सोने आणि 9.86 कोटींची रोकड आढळली. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत ही कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. या कारवाईदरम्यान भोपाळजवळ मेंडोरी जंगलात उभ्या असलेल्या इनोव्हा कारवर आयकर विभागाने छापा टाकला. छापेमारीत कारमध्ये आढळलेला मुद्देमाल पाहून आयकर विभागाचे अधिकारी हैराण झाले.
लोकायुक्त आणि आयकर विभागाकडून दोन दिवस ही संयुक्त कारवाई सुरू होती. या कारवाईत 100 हून अधिक पोलीस कर्मचारी सहभागी होते. याआधी आयकर विभागाने भोपाळ आणि इंदूरमधील एका कन्स्ट्रक्श कंपनीशी संबंधित 51 ठिकाणी छापेमारी केली.
याशिवाय भोपाळमधील माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घर आणि कार्यालयात लोकायुक्तांनी छापेमारी केली. या छापेमारीत 2 कोटी 85 लाख रुपयांची रोकड, 60 किलो चांदी आणि 50 लाखांचे सोने-हिऱ्यांचे दागिने जप्त केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List