साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही; नववर्षात जयंत पाटील यांचा निर्धार

साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही; नववर्षात जयंत पाटील यांचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी 2024 या वर्षाचा आढावा घेत पुढील लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. आपण साहेबांचे कार्यकर्ते आहोत. साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांना कारकर्त्यांना पुढील लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार परिवारातील सर्व सदस्य, आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! 2024 हे वर्ष आपल्या पक्षासाठी अत्यंत संमिश्र असे वर्ष होते. एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक 8 खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असे यश आपल्याला मिळाले. अर्थात, या अपयशाची कारणीमिमांसा विविध स्तरांवर चालू आहेच.

आता दिन दुबळ्यांची, पददलितांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची हि वेळ आहे. सह्याद्री सारख्या कणखर अशा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही.

निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात. आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही, हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होऊयात ! छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा DNA आहे, हे आपण विसरता कामा नये.

निवडणुकीतील लाट हि केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे.

पुन्हा एकदा आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या मनःपुर्वक शुभेच्छा ! असे पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना नव्यानं लढण्यासाठी त्यांनी एक पोस्ट करत उभारी देण्याचा प्रयत्नही यातून केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sunita Ahuja : रवीना टंडन आणि गोविंदाच्या नात्याबद्दल पत्नी सुनीता म्हणाली, ‘माझ्या आधी ती….’ Sunita Ahuja : रवीना टंडन आणि गोविंदाच्या नात्याबद्दल पत्नी सुनीता म्हणाली, ‘माझ्या आधी ती….’
बॉलिवूडचा स्टार गोविंदा आजही अनेकांना भावतो. त्याने आपला अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून बरीच फॅन फॉलोईंग कमावली आहे. गोविंदाची पत्नी सुनीता...
मला श्रीदेवी आवडायची, त्यांची लेक आवडत नाही – राम गोपाल वर्मा थेट बोलले
वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट द्या
बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या, संजय राऊत यांनी फटकारले
आपवर हल्ले करण्यापेक्षा चीनला डोळे दाखवा, संजय राऊत यांनी भाजपला सुनावले
CRPF जवानांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवणाऱ्या पत्रकाराची निर्घृण हत्या, सेप्टिक टॅंकमध्ये आढळला मृतदेह
Jasprit Bumrah – जसप्रीत बुमराहनं सामना सुरू असताना मैदान सोडलं; कोहली कर्णधार, नक्की झालं काय?