मिरजेतील ‘हिंद एज्युकेशन’च्या शिक्षकासह लिपिकाला अटक; पगाराची रक्कम मंजूर करण्यासाठी लाखाची मागणी

मिरजेतील ‘हिंद एज्युकेशन’च्या शिक्षकासह लिपिकाला अटक; पगाराची रक्कम मंजूर करण्यासाठी लाखाची मागणी

महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची 19 लाख रुपयांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्क्यांप्रमाणे 1 लाख 10 हजार रुपये लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मिरजेतील हिंद एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक उमेश मारुती बोरकर, (वय – 36, रा. कवठे एकंद, ता. तासगाव) आणि कनिष्ठ लिपिक युवराज मनोहर कांबळे (वय – 56, रा. बौद्ध वसाहत, वेडग, ता. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दोघांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदारांची पत्नी सांगलीतील दोन महाविद्यालयांत संस्कृत विषय शिकविण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दोन्ही आस्थापनांकडील सुमारे दोन वर्षांचे एकूण 19 लाख 45 हजार 710 रुपये येणे बाकी होते. एकूण तीन पगार बिले दोन्ही कॉलेज प्रशासनाने मंजुरीसाठी जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील पे युनिट कार्यालयाकडे पाठवली होती. तक्रारदारांच्या पत्नी या थकीत बिलासाठी पाठपुरावा करत असताना उमेश बोरकर याने सहा टक्के लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी 14 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारीनुसार 28 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली.

हिंद एज्युकेशन सोसायटीचा नरवाड येथील शिक्षक उमेश बोरकर याने थकीत बिलाची रक्कम अधीक्षक करमुसे व लिपिक मंडले यांना सांगून मंजूर करून आणतो, असे सांगितले. त्यासाठी 1 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तर हिंद एज्युकेशनच्या न्यू इंग्लिश स्कूल सोनी येथील कनिष्ठ लिपिक युवराज कांबळे याने लाचेच्या मागणीवेळी उपस्थित राहून तक्रारदारांनी लाच द्यावी म्हणून प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.

उमेश बोरकर व युवराज कांबळे यांनी 1 लाख 10 हजारांची लाच मागितली. परंतु, पैसे स्वीकारले नव्हते. त्यामुळे लाचेच्या मागणीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला. तेथून परवानगी मिळाल्यानंतर बोरकर व कांबळे याला अटक करून विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.

पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोर खाडे, पोलीस अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, पोपट पाटील, सलीम मकानदार, अतुल मोरे, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, विठ्ठल रजपूत यांच्या पथकाने कारवाई केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार! पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!
पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के...
आव्हाडांवर सरकारची पाळत, पोलिसांनी पत्रकार परिषदेत घुसून केले शूटिंग
लक्षवेधी – ‘ब्लिंकिट’ची 10 मिनिटांत अ‍ॅम्ब्युलन्स सेवा
मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर, राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
एटीकेटी-कॅरी ऑनचा विषय अ‍ॅकेडमिक कौन्सिलसमोर मांडणार, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा कहर, चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर
अबब! दिवसाला 48 कोटी पगार, हिंदुस्थानी वंशाच्या सीईओची थक्क करणारी कमाई