चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी 28 आरोपींना जन्मठेप, NIA कोर्टाने सुनावली शिक्षा
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी एनआयए कोर्टाने गुरूवारी निकाल सुनावला आहे. एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी गुरुवारी चंदन गुप्ता हत्याकांडातील 28 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पुरव्याअभावी दोन आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात 26 जानेवारी 2018 रोजी तिरंगा यात्रेदरम्यान चंदन गुप्ताची हत्या झाली होती. दोन गटात झालेल्या वादातून चंदनची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर उत्तर प्रदेशात हिंसाचार उफाळला होता.
या हत्येप्रकरणी पोलिसानी 30 जणांविरोधाच आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी 28 जणांना दोषी ठरवत एनआयए न्यायालयाने जन्मठेप सुनावली. तर दो आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. शिक्षा झालेल्यांपैकी एक आरोपी अन्य हत्याकांडाच्या प्रकरणी आधीच तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List