छत्तीसगडमध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील सोरनामाल जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या मोहिमेत 300 जवान सहभागी झाले होते.
सोरनामाल जंगलात नक्षलवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरजी, एसटीएफ आणि आरपीएफच्या 300 जवानांनी संयुक्त मोहिम रावबत जंगल परिसराला घेराव लागला.
यावेळी नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यास सुरक्षादलाला यश आले आहे. पोलीस अधिक्षकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List