शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला राजगड; आग्र्याहून सुटकेचा 358 वा स्मृतिदिन साजरा
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ च्या जयघोषात किल्ले राजगडावर 358 वा आग्ग्राहून सुटका स्मृतिदिन सोहळा थाटात साजरा झाला.
श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे आणि पुणे महापालिकेतर्फे किल्ले राजगड येथे 44 वा दुर्ग राजगड उत्सव आयोजित करण्यात आला होता. किल्ले राजगड आणि पाल खु. येथील खंडोबाचा माळ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध शेत्रांतील मान्यबर, बक्ते, इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खंडोबाचा माळ येथे शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. मर्दानी खेळ व ढोल-ताशांच्या गजरात कार्यक्रमास सुरुवात झाली. शिवव्याख्याते प्रा. विनायक खोत यांचे शिव व्याख्यानदेखील झाले.
राजगडावरील पद्मावती मंदिरात जागरण गोंधळ घालून गड जागरणाचा कार्यक्रम करण्यात आला. किल्ले राजगडावर पद्मावती देवीचे पूजन करून वंश परंपरेने किल्लेदार सूर्यकांत भोसले व 13 मिनिट 48 सेकंद वेळेत किल्ल्यावर येणारे सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात पालखीचे आगमन झाले.
पाली दरवाजा येथे निवेदिता पायगुडे, शीतल पासलकर, दीपाली कारळे, नीलम कुंजीर, पूनम पायगुडे, वैशाली कुन्हाडे, जया राऊत आदी महिलांनी पालखीचे पूजन केले. पारंपरिक पोशाखातील मावळे व महिला सहभागी झाल्या होत्या. ‘जय जिजाऊ, जय शिवरायां’च्या घोषणा देत पालखी सोहळा सदरेवर आला. तेथे पालखी थोडा वेळ आसनस्थ झाली. व यानंतर पद्मावती मातेच्या मंदिरात देवीला साडीचोळी देऊन पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, रणजीत पठारे, नितीन चव्हाण, राहुल पायगुडे, संजय दापोडीकर, सुनील वालगुडे, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सतीश सोरटे, नरेंद्र मुजुमदार, पांडुरंग दडिंगे, शिवाजी पोळेकर, नाना शिर्के, करण भोसले, योगेश दर्डिगे, प्रकाश भोसले, अमित दारवटकर, समीर रुपदे, योगेंद्र भालेराव, मंगेश राव, अमोल व्यवहारे, अभिजीत पायगुडे, पांडुरंग मोरे, वीरेंद्र ठाकूर, शशी रसाळ, नीलेश बारावकर, प्रशांत पायगुडे, निखिलेश ठाकूर, विवेक नाकोड, गुरुदत्त भागवत, संजय शेंडकर, सुनील तोंडे, महेश कदम, राम कदम, गोविंद राऊत आदी सहभागी झाले होते. पाल खु. राजगड परिसर सर्व ग्रामपंचायत व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य व सहायक संचालक (पुरातत्व) पुणे विभाग यांच्या विशेष सहकार्यातून हा उत्सव पार पडला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List