मिंधे गटाच्या खासदाराचा पोलिसांवर हप्तेवसुलीचा आरोप; तर भाजप आमदाराकडून पोलिसांचे कौतुक
महायुतीतील मिंधे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्यावरच हप्तेखोरीचे आरोप केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काही पोलीस ठाण्यांतील अधिकारी-कर्मचारी वरिष्ठांना हप्ता देण्यासाठी सर्रासपणे हप्तेवसुली करीत असल्याचा आरोप बारणे यांनी केला आहे. तर दुसरीकडे बारणे यांचा आरोप खोडत भाजप प्रवक्ते-आमदार अमित गोरखे यांनी गृह खात्याच्या कामावर समाधान व्यक्त करीत गृह खाते तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस चांगले काम करीत आहेत, असे स्पष्ट करीत पोलिसांच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.
खासदार बारणे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनात पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात नाही, असा आरोप केला आहे. तर भाजप प्रवक्ते आणि विधान परिषदेतील आमदार अमित गोरखे यांनी ‘‘गृह खाते तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस चांगले काम करीत आहेत, असे म्हटले आहे.
महायुतीतील सत्ताधारी नेत्याला गुन्हेगाराचा पुळका
महायुतीतील सत्ताधारी बडय़ा नेत्याला शहरातील एका कुख्यात गुंडाचा चांगलाच पुळका आला आहे. तब्बल 19 गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराचे नाव नुकत्याच घडलेल्या एका गंभीर गुह्यातून वगळण्यासाठी हा बडा नेता पोलिसांवर दबाव टाकत होता. मात्र पोलिसांनी या बडय़ा नेत्याचा दबाव झुगारून संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकाराने बडा नेता खूपच दुखावल्याने त्याचा राग अनावर झाला आहे, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List