अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर भुमाफियांचा हल्ला, ठाण्यातली धक्कादायक घटना
ठाण्यात अनधिकृत बांधकाम करण्याऱ्यांची भुमाफियांची मग्रुरी वाढली आहे. ठाण्यात अनधिकृत बांधकाम करण्याऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या एका अधिकाऱ्यावर भुमाफियांनी हल्ला केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगर पालिकेचे दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त भालचंद्र घुगे हे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायला गेले होते. तेव्हा काही भुमाफियांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी वेळीच धाव घेतली आणि पुढचा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी भुमाफियांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List