वयाने 15 वर्षांनी मोठ्या घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री?

वयाने 15 वर्षांनी मोठ्या घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री?

‘बिग बॉस’चा अठरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये प्रेक्षकांना बराच ड्रामा, मस्करी आणि काही स्पष्टीकरणं पहायला मिळाली. सूत्रसंचालक सलमान खान अनेकदा स्पर्धकांना गमतीशीररित्या कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतो. या एपिसोडमध्ये त्याने अभिनेत्री ईशा सिंहची तिच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चांवरून थट्टा केली. यामुळे घरातील इतर स्पर्धक आणि प्रेक्षकसुद्धा चकीत झाले. ईशा सिंहचं नाव तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या शालीन भनोटशी जोडलं जातंय. शालीन हा अभिनेत्री दलजीत कौरचा पूर्व पती आहे.

‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमानने ईशाला विचारलं, “बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी तू शेवटचा फोन कोणाला केला होतास?” या प्रश्नाचं उत्तर देताना ईशा अडखळते, तेव्हाच सलमान शालीनच्या नावाची हिंट देतो. ईशा लाजताच सलमान मस्करी करत म्हणतो, “बॉयफ्रेंड नसेल, खूप जवळचा मित्र असेल, कदाचित मी त्याला ओळखतो, त्याचा स्वभाव खूपत शांत असेल, शालीन असेल.” हे ऐकल्यानंतर ईशा आणि बिग बॉसच्या घरातील चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे असतात. ईशाच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहून शालीन आणि तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

ईशाला ही गोष्ट समजताच ती तिची बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. “शालीन माझा खूप चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र काम केलंय, त्यामुळे अर्थातच आमच्याच चांगली मैत्री आहे. यापेक्षा आमच्याच काहीच नाही. शालीन आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. मी त्याचा खूप आदर करते. या नात्यात इतकंच सांगण्यासारखं आहे”, असं ती म्हणते. हे ऐकल्यानंतर करण वीर ईशाची मस्करी करत ‘खतरों के खिलाडी’ या शोमधील किस्सा सांगतो. या शोदरम्यान शालीन आणि ईशा सतत व्हिडीओ कॉलवर एकमेकांशी बोलत असायचे, असा खुलासा करण वीर करतो. मात्र त्यानंतरही ईशा रिलेशनशिपच्या चर्चा नाकारत केवळ मित्र असल्याचं स्पष्ट करते.

शालीनने 2009 मध्ये अभिनेत्री दलजीत कौरशी लग्न केलं होतं. या दोघांना जेडन हा मुलगा आहे. लग्नाच्या सहा वर्षांतच शालीन आणि दलजीत विभक्त झाले. घटस्फोटादरम्यान दलजीतने शालीनवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List