रेल्वे ट्रॅकवर सिलिंडर, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला; गुन्हा दाखल
पुण्यातील उरळी कांचनमध्ये रेल्वे ट्रॅकवर भरलेला सिलिंडर मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञान व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साधारण 11 च्या दरम्यान लोको पायलट शहाजी वाळके हे रेल्वे लाईनचे निरीक्षण करत होते. याच दरम्यान त्यांना पटरी शेजारी प्रिया गोल्ड कंपनीचा भरलेला सिलिंडर आढळून आला. त्यांनी ताबडतोब सिलिंडर पटरीपासून लांब नेला. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. त्यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटानस्थळी जाऊन तपासणी केली. त्याच बरोबर अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 150, 152 अंतर्गत अपघाताचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List