प्रसिद्ध अभिनेत्रीचे जॉन अब्राहमवर गंभीर आरोप, ‘9 वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्याने मला सोडलं, मी रडत राहिली तो मात्र…’
John Abraham love Life: अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्याचं नाव अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. एका अभिनेत्रीसोबत तर जॉन एक दोन नाही तर, 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. पण अभिनेत्याने एका रात्रीत अभिनेत्रीची साथ सोडली आणि प्रिया रूंचाल (Priya Runchal) हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अभिनेता पत्नीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिला. ज्या अभिनेत्रीने जॉनवर गंभीर आरोप केले, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री बिपाशा बासू आहे. बिपाशा बासू हिने अभिनेता करण ग्रोव्हर याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी डिनो मोरिया आणि जॉन अब्राहम याला डेट केलं.
बिपाशा बासू हिने जॉनला तब्बल 10 वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशा हिने जॉन याच्यावर फसवणुकीचे आरोप लावले होते. मुलाखतीत बिपाशा हिने जॉनसोबत असलेल्या नात्याचा मोठा खुलासा देखील केला होता.
अभिनेत्री म्हणाली, ‘फसवणूक, अविश्वास आणि छळ…. याला माफ करणं शक्य नाही. त्यानंतर मैत्रीसाठी हात पुढे करणं शक्य नाही… मला असं वाटलं त्याने मला सोडून दिलं आहे… तोपर्यंत मी माझ्या आयुष्यात आनंदी होती. पण आज मला असं वाटतं की, मी किती मुर्ख होती…’
‘ते 9 वर्ष मी स्वतःला कामापासून दूर ठेवलं. ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. ज्या व्यक्तीवर मी प्रमे करत होती, त्या व्यक्तीसाठी मी खंबीर उभी राहिली. नातं टिकवून ठेवण्यासाठी मी अधिक वेळ दिला. इतर लोकांना भेटली नाही. त्यानंतर अचानक माझ्या लक्षात आलं, ज्या व्यक्तीसाठी इतकी मेहनत घेतली, ती व्यक्ती मला सोडून निघून गेली. आता सर्वकाही संपलं आहे, हे जाणून घेण्यास मला कित्येक महिने लागले…’
‘त्याने मला सोडून दिलं. मी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. मी ओरडत राहिली… एकटी राहू लागली… यामुळे मला प्रचंड दुःख झालं.’ असं बिपाशा बासू म्हणाली होती. असं देखील बिपाशी म्हणाली होती. बिपाशाच्या वक्तव्यावर जॉन याने देखील स्वतःचं मत मांडलं होतं.
मुलाखतीत अभिनेता म्हणाला होता, ‘मी अशा कुटुंबातून येतो जेथे विश्वास आणि प्रामाणिकपणाला फार महत्त्व आहे. मी कोणाचीही फसवणूक करु शकत नाही… माझ्या DNA मध्ये खोटे पणा नाही…’, सांगायचं झालं तर जॉन आणि बिपाशा त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असले तरी कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List