रुपया मावळला, वर्ष संपताना पुन्हा विक्रमी घसरण; नव्या वर्षात महागाईचे गिफ्ट

रुपया मावळला, वर्ष संपताना पुन्हा विक्रमी घसरण; नव्या वर्षात महागाईचे गिफ्ट

तब्बल 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या मोदी सरकारला वर्ष संपतानाही रुपया बुडण्यापासून वाचवण्यात अपयश आले. रुपया पुन्हा मावळला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13 पैशांनी घसरून 85.65 वर पोहोचला आणि विक्रमी घसरण नोंदवली गेली.

रुपया आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणारे चलन ठरल्याची टीका काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे क्रुड तेलाचे दरही वाढण्याची शक्यता असून इंधनाचा भडका उडणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात महागाईचे गिफ्ट मिळणार असून मोदी सरकारला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचे समोर आले आहे.

वर्षाच्या शेवटी रुपया तब्बल 3 टक्क्यांनी घसरला. फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात न करण्याचा घेतलेला निर्णय आणि डॉलर इंडेक्स तसेच अमेरिकेच्या बॉण्ड उत्पन्नात वाढ करणाऱ्या ट्रम्प फॅक्टरमुळे रुपयावर सातत्याने दबाव येत असून रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारातील थंड वातावरण, व्यापार-उद्योगाला बसलेला फटका, वाढत जाणारे नुकसान आणि परदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे रुपया घसरत गेल्याचे समोर आले आहे.

असा घसरला रुपया

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 85.54 पैशांवर खुला झाला आणि दिवसभरातील अंतर्गत व्यवहारादरम्यान रुपया डॉलरच्या तुलनेत 85.66 पैशांच्या नीचांकी पातळीवर घसरला, तर बाजार बंद होताना रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 85.65 पैशांवर बंद झाला. सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 4 पैशांनी घसरून 85.52 वर स्थिरावला होता.

नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांकडे काहीच बोलण्यासारखे नाही – काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रुपयाच्या घसरणीवर यावेळी बोलण्यासारखे काहीच नाही, अशा शब्दांत काँग्रेसने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींना त्यांच्या 2013 च्या विधानाची आठवण करून दिली आहे. यात त्यांनी यूपीए सरकारच्या नेतृत्वावर टीका करताना ते दिशाहीन झाले असून त्यांना ना देशाच्या रक्षणाची चिंता आहे, ना घसरणाऱ्या रुपयाच्या किमतीची. त्यांना केवळ आपली खुर्ची टिकवून ठेवण्याची चिंता आहे, असे मोदी म्हणाले होते. 16 मे रोजी रुपया 58.58 प्रति अमेरिकेन डॉलरवर बंद झाला. दहा वर्षांनंतर रुपयाने प्रति यूएसडीवर बंद झाला. दहा वर्षांनंतर रुपयाने प्रति यूएसडी 85.27 ही आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली आहे याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.

नेतृत्व दिशाहीन असेल तर संकट गंभीर बनते

काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, संकटे येतात, पण संकटाच्या वेळी जर नेतृत्व दिशाहीन, हताश असेल तर संकट खूप गंभीर बनते. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना ना देशाच्या संरक्षणाची चिंता आहे ना रुपयाच्या घसरत्या किमतीची. काळजी वाटत असेल तर ती केवळ त्यांची खुर्ची वाचवण्याची. दरम्यान, पंतप्रधानांच्या माजी मुख्य आर्थिक सल्लागारानेही काही दिवसांपूर्वीच रुपयाच्या घसरणीवर भाष्य केले आहे. आरबीआयने रुपया स्थिर करण्यासाठी अब्जावधी डॉलरचा परकीय चलनसाठा वापरला, परंतु त्याचा काहीही परिणाम झाला नाही, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

शेअर बाजारातही घसरगुंडी

भारतीय शेअर बाजारातही वर्षाच्या शेवटी झालेल्या कामकाजादरम्यान सेन्सेक्स 109.12 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 78,139.01 वर बंद झाला, तर बाजार बंद होताना सेन्सेक्स 687.34 अंकांनी किंवा 0.87 टक्क्यांनी घसरून 77,560.79 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीतही 0.10 अंकांची घसरण होऊन तो 23,644.80 अंकांवर बंद झाला. दरम्यान, बटेक महिंद्रा, झोमॅटो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनिलीव्हर आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसली, तर कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वधारले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?