अद्याप 15 दिवसही झाले नाहीत… आणि जगजाहीर झाली नागा चैतन्य – शोभिता यांची भांडणं?
Naga Chaitanya – Sobhita Dhulipala: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनाता नागा चैतन्य याने गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न केलं. 4 डिसेंबर रोजी नागा चैतन्य आणि शोभिता यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. पण लग्नाच्या काही दिवसांनंतरच नागा चैतन्य आणि शोभिता यांच्यात काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अभिनेता रागात असल्याचं चित्र दिसून आलं. सांगायचं झालं तर, दोघे एकत्र बाहेर गेले होते. तेथे दोघांना पापाराझींना कॅमेऱ्यात देखील कैद केलं. चैतन्य, ज्याचे आधीच सोलो फोटो क्लिक झाले होते, त्याने फोटो क्लिक करण्यासाठी शोभिताला बोलावलं. शोभिता फोटो काढायला गेली तेव्हा नागा चैतन्यच्या चेहऱ्यावर राग होता.
तेव्हा नागा चैतन्य प्रचंड रागात होता असं देखील सांगण्यात येत आहे. कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडीओ नसल्यामुळे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कार्यक्रमात नक्की काय झालं याचं कारण समजू शकलेलं नाही. एकीकडे नागा चैतन्य रागात दिसला तर, शोभिताच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली.
नागा चैतन्य – शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी 8 ऑगस्ट रोजी हैदराबाद याठिकाणी साखरपुडा केला. अभिनेत्याचे वडील नागार्जुन यांनी मुलगा आणि होणाऱ्या सूनेचे फोटो पोस्ट करत दोघांना शुभेच्छा दिल्या.
समंथा रुथ प्रभू – नागा चैतन्य
समंथा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करत आहे. 2017 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट झाल्याची घोषणा केली. घटस्फोटानंतर समंथा हिने अनेक अडचणींचा देखील सामना केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List