आयआरसीटीसीची वेबसाइट पुन्हा कोलमडली
सर्वत्र नववर्षाची लगबग असताना आयआरसीटीसीचे मात्र पावणे पाच सुरूच आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइट पुन्हा कोलमडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. आज पुन्हा एकदा आणि डिसेंबरमध्ये तिसऱ्यांदा आयआरसीटीसीने घोटाळा केल्याने पर्यटनाचे नियोजन करत असलेल्यांची धांदल उडाली. अनेक प्रवाशांमध्ये ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असा सूर होता. तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान सकाळी 10 च्या सुमारास वेबसाइट ठप्प झाली. मागील आठवड्यातही तांत्रिक बिघाडामुळे अशीच समस्या उद्भवली होती.
तिकीट बुकिंगचे इतर पर्याय
सततच्या समस्येचा सामना करण्यासाठी अनेक प्रवासी आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅपचा आधार घेतात. या माध्यमातून रेल्वे शोधण्यासाठी आणि तिकीट बुक करण्यासाठी मदत होते. गुगल प्ले स्टोअरवरूनही अॅप डाऊनलोड करता येतो. याशिवाय प्रवाशांना अधिकृत तिकीट एजंट अथवा ट्रव्हल्स एजन्सीकडून तिकीट बुक करता येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List