नववर्षाच्या सुरुवातीलाच हुडहुडी भरणार; कसे असेल राज्यातील हवामान…
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. राज्यात थंडीची सुरुवात झाल्यानंतर राज्यात काही जिल्ह्यात अवकाळीच्या सरी बरसल्या. त्यानंतर आता पुन्हा काही जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. आता नवीन वर्ष 2025 सुरु होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात हुडहुडी भरायला सुरुवात होणार आहे.
नवीन वर्ष जानेवारी 2025 चे स्वागत कडाक्याच्या थंडीनं होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आता राज्यातील अवकाळीचे ढग दूर झाले असल्याने थंडीत वाढ होणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत थंडीने होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानपसार राज्यात थंडी जाणवत आहे. आता नवीन वर्षात राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे.
आगामी आठवडाभर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी चांगलीच वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक, नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात थंडीचा प्रभाव अधिक राहील.तसेच आठवड्याभरात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर आणि तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List