बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाचे वारे
बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटण्याचे संकेत आहेत. ढाका येथे सुरू असलेल्या मार्च फॉर युनिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून विद्यार्थी सेंट्रल शहीद मिनारवर पोचले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन अँटी डिस्क्रीमिनेशन स्टुडंट मूव्हमेंट ग्रुपने केले आहे. विद्यार्थ्यांनी ढाका युनिव्हर्सिटीच्या दिशेने मोर्चे काढायला सुरुवात केली. निरपराध विद्यार्थ्यांना मारणारे अद्याप मोकाट आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. हजारो हुतात्म्यांचे बलिदान ओळखून जनतेच्या आकांक्षांचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी जुलै क्रांतीची घोषणा आवश्यक आहे, असे विद्यार्थी चळवळ गटाचे सचिव आरिफ सोहेल यांनी लेखी निवेदनात सांगितले.
पश्चिम बंगालच्या सीमेवरील बंकुरा गावात रविवारी संध्याकाळी झीनतला बेशुद्ध करून पकडण्यात आले. शनिवारी संध्याकाळपासून पाच वेळा वन विभागाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते यशस्वी झाले नव्हते. ओडिशा, झारखंड, बंगाल अशा तीन राज्यांतून 300 किलोमीटरहून अधिक प्रवास तिने केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List