Maruti ते Mahindra; 1 जानेवारीपासून ‘या’ 5 कंपन्यांच्या गाड्या महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maruti ते Mahindra; 1 जानेवारीपासून ‘या’ 5 कंपन्यांच्या गाड्या महागणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

बुधवारपासून (1 जानेवारी 2025) देशात नवीन कार खरेदी करणं महाग होणार आहे. 1 जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार असल्याचे कार कंपन्यांनी आधीच जाहीर केले होते. अशातच आज (31 जानेवारी) शेवटचा दिवस आहे, जेव्हा तुम्हाला नवीन कारवर चांगली सूट मिळू शकते. कारण आज जी सूट दिली जात आहे ती उद्यापासून तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आजच कार बुक करू शकता. नवीन वर्षात कोणत्या कारच्या किंमती वाढणार आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ…

नवीन वर्षात मारुती सुझुकीच्या कार खरेदी करणे महाग होणार आहे. कंपनीने कारच्या किमतीत 4 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे, जी वेगवेगळ्या मॉडेल्सवर अवलंबून असेल. मात्र ही वाढ कारच्या एक्स-शोरूम किमतीवर लागू होईल. कंपनीने वाढती इनपुट कॉस्ट आणि वाढती लॉजिस्टिक खर्च ही किंमत वाढण्यामागील कारण सांगितलं आहे.

Hyundai Motor India ने आधीच घोषणा केली होती की, 1 जानेवारी 2025 पासून त्यांची सर्व वाहने 25,000 रुपयांनी महाग होतील. इनपुट कॉस्ट, एक्स्चेंज रेटचा परिणाम आणि लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीला किमती वाढवाव्या लागल्या आहेत, असं सांगण्यात येत आहे. यातच तुमच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत Hyundai कारवर सूट मिळण्याची संधी आहे. Hyundai च्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे झाले तर सध्या कंपनीकडे Grand i10 Nios ते IONIQ 5 सारख्या प्रीमियम कार आहेत.

Tata Motors ने जाहीर केले आहे की, 1 जानेवारी 2025 पासून देशभरात त्यांच्या गाड्या 3 टक्क्यांनी महाग होणार आहेत. खर्च वाढल्यामुळे कंपनीने किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात टाटाच्या कारवर लाखोंची सूट आहे, जी फक्त 31 डिसेंबरपर्यंतच राहील. आज सवलतीचा शेवटचा दिवस आहे.

महिंद्राची वाहनेही 1 जानेवारीपासून 3 टक्क्यांनी महागणार आहेत. कंपनीने वाढत्या इनपुट खर्च आणि वाढत्या लॉजिस्टिक खर्चाची कारणे दिली आहेत. सध्या कंपनीकडे XUV 3XO, बोलेरो, थार, Thar Roxx, Scorpio Classic, XUV 700, Marazoo आणि XUV 400 सारखी वाहने आहेत. या महिन्यात महिंद्राच्या कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे, ज्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

1 जानेवारीपासून Kia कार 2 टक्क्यांनी महाग होणार आहेत. कंपनीने वाढती इनपुट कॉस्ट, कमोडिटीच्या किमतीत वाढ आणि प्रतिकूल विनिमय दर ही किमती वाढण्यामागील कारणे सांगितली आहेत. सध्या कंपनीकडे Sonet, Seltos, Carens, EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर SUV, Carnival आणि EV9 इलेक्ट्रिक फ्लॅगशिप SUV आहेत. या महिन्यात Kia कारवर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट दिली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?