विद्यार्थ्यांवर लाठीमारचा आदेश देणाऱ्या IPS स्वीटी सेहरावत कोण आहेत? वाचा…
बिहारमध्ये BPSC परीक्षेचा मुद्दा जोरदार गाजत आहे. पेपरफुटीवरून सुरू झालेला गोंधळ अद्याप सुरुच आहे. संपूर्ण राज्यातील परीक्षा पुन्हा व्हावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी गांधी मैदानावर मोठया संख्येने विद्यार्थी जमले होते. परंतु पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करत आंदोलकांना पांगवले होते. परंतु या प्रकरणामुळे लाठीमारचे आदेश देणाऱ्या IPS अधिकारी स्वीटी सेहरावत यांचे नाव चर्चेमध्ये आले आहे.
पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या स्वीटी सेहरावत यांचा जन्म 15 मार्च 1992 रोजी सर्व सामान्य कुटुंबातला. दिल्लीमध्ये पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या वडिलांचा 2013 साली अपघाती मृत्यू झाला होता. आपल्या मुलीने IAS अधिकारी व्हावे, अशी वडीलांची इच्छा होती. सुरुवातीला डिझाईन इंजिनिअर या पदावर त्या एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होत्या. परंतु वडीलांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2018 साली त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ अभ्यासाला सुरुवात केली.
स्वीटी यांनी दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी क्लास लावला होता. पंरतु त्यांना त्याचा फार काही फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी 2018 साली क्लास सोडला आणि स्वत:च घरच्या घरी अभ्यास करालला सुरुवात केली. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना 2019 साली मिळाले. ऑल इंडिया 187 वी रँक प्राप्त करत त्यांनी IAS पदाला गवसणी घातली आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List