राजकारणी वाल्मीक कराडला संरक्षण देत होते, यात शंकाच नाही; अंजली दमानिया यांचा आरोप
बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी फरार वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. मात्र, तो शरण आल्यावर प्रसारमाध्यमांना गुंगारा देत त्याला मागच्या दाराने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्याच्या अटकेबाबत आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अंजली दमानिया यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं का? खरेतर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. 17 तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडरही पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही, असे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरातर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते.
पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत… pic.twitter.com/NsXDp0djky
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 31, 2024
देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचे राजकीय संबंध आणि एका बड्या नेत्याचा असलेला पाठिंबा याबाबत विरोधीपक्ष, दमानिया आणि जनता आवाज उठवत आहे. आता कराड पुण्यात असूनही तो पोलिसांना सापडत नव्हता, हे बुद्धीला पटण्यासारखे नाही. त्यामुळे त्याला राजकारणी संरक्षण देत होते, यात शंकाच नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List