तरुणीच्या प्रेमात दिवाना, युपीच्या तरुणाने पाकिस्तान गाठलं आणि पोलीस कोठडीत झाली रवानगी
हल्ली सोशल मीडियावरून प्रेमप्रकरणाच्या घटना वाढल्या आहेत. याच प्रेमापायी तरुण मंडळी काय करतील याचा नेम नाही. अशीच एक उत्तर प्रदेशात घडली आहे. फेसबुकवरील प्रेमासाठी एक तरुण थेट सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहचला. मात्र बेकायदेशीर घुसखोरी केल्याप्रकरणी लग्नाच्या बेडीऐवजी लष्कराची बेडी हातात पडली.
बादल बाबू हा 30 वर्षीय तरुण असे अटक केलेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढच्या नगला खटकरी गावचा रहिवासी आहे. बादलला पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी मंडी बहाउद्दीन परिसरातून अटक केली.
बादलची फेसबुकच्या माध्यमातून एक पाकिस्तानी महिलेशी ओळख झाली. पुढे मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बादलने बेकायदेशीररित्या थेट पाकिस्तान गाठले. बादलने मंडी बहाउद्दीन परिसरात कथितरित्या महिलेची भेटही घेतली. त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याला पकडले.
बादलकडे कोणतेही कागदपत्रं किंवा पुरावे नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. बादलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधीही बादलने दोनवेळा हिंदुस्थान-पाकिस्तानची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला. तिसऱ्यांदा सीमा ओलांडून पाकिस्तानात जाण्यास बादल यशस्वी झाला आणि त्यानंतर थेट तुरुंगात गेला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List