Good Bye 2024 – लापता लेडिज ते काल्की… हे आहेत 2024 चे सुपरहिट चित्रपट
बॉ़लीवूडसाठी 2024 हे वर्ष सुवर्ण ठरले आहे. स्त्री 2 ने 857 कोटीं कमाई केली. त्याचबरोबर शैतान, सिंघम अगेन, भुलभुलैया या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.
लापता लेडिज
किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला लापता लेडिज प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अगदी साध्या सोप्या धाटणीचा हा सिनेमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा ऑस्करच्या वारीतही पोहोचला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 21.11 कोटींची कमाई केली.
पुप्षा 2
सुकुमार यांनी दिग्दर्शित अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल स्टारर ‘पुष्पा 2: द रूल’ हा सिनेमा रिलीज होण्याच्या एक महिना झाला नाही. या सिनेमाची क्रेझ अद्याप थांबण्याचे नाव घेत नाही. सिनेमाच्या चौथ्या आठवड्यातही बक्कळ कमाई केली आहे. हा सिनेमा अकराशे पन्नास कोटी पार केले आहेत. लवकरच 1200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
काल्की 2898
प्रभास आणि दीपिका पादुकोणचा कल्कि 2898 एडी ने बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन केले आहे. आता प्रत्येकजण या सिनेमाच्या सिक्वेलची वाट पाहत आहेत. 27 जून रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कल्कि’ने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. जगभरात एक हजार कोटीच्या क्लबमध्ये चित्रपटाने प्रवेश केला आहे. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही हा चित्रपट दमदार कमाई करत आहे.
स्त्री 2
श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा ‘स्त्री 2’ बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड केला आहे. बॉलीवूडमध्ये इतिहास रचत ‘स्त्री 2’ ने ‘बाहुबली 2’, ‘केजीएफ’ 2′, ‘आरआरआर’ सारख्या सिनेमांना मागे टाकलेय. अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री 2 – सिनेमाने हिंदुस्थानच्या बॉक्स ऑफिसवर 604.22 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइज 713 कोटींचे कलेक्शन जमवले आहे.
महाराजा
अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला विजय सेतूपती आणि अनुराग कश्यप यांचा महाराजा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला महाराजा सिनेमा. या सिनेमात अनुराग कश्यप यांनी अॅक्टिंग केली आहे, त्यांनी यामध्ये निगेटिव्ह रोल इतका चांगला निभावला की प्रेक्षकांना त्यांचा प्रचंड राग येऊ लागला. निथिलन स्वामिनाथन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. उत्कंठा वाढलणारा हा सिनेमा असून क्लायमॅक्स जबरदस्त झटका देतो.
शैतान
शैतान हा हॉरर, थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता आर माधवन स्टारर असलेला या सिनेमा ने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. सगळीकडे शैतान सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळतो. 65 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला सिनेमा 130 कोटींचा गल्ला गाठतो. मोजक्यात कलाकारांसोबत साकारण्यात आलेला शैतान सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. या सिनेमाने देशात 177 कोटी तर वर्ल्डवाइज मार्केटमध्ये 211 कोटींची कमाई केली.
भुल भुलैय्या 3
भूल भुलैय्या या हॉरर कॉमेडी सिनेमाचा तिसरा सिक्वेल सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केलेला भुलभुलैया हा सिनेमा 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात कार्तिक आर्यनसह राजपाल यादव, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. भुलभुलैया 3 सिनेमा वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 405कोटी 41 लाख रुपये कमावले आहेत.
सिंघम अगेन
रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन मल्टिस्टारर सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. या सिनेमाने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली होती. 1 नोव्हेंबर रोजडी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 44 कोटींची कमाई केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List