सूरतमध्ये हजीरा स्टील प्लांटमध्ये अग्नीतांडव, आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू; सहा जण जखमी
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सूरतमध्ये भीषण घटना घडली आहे. हजीरा येथील AMNS इंडियाच्या स्टील प्लांटला आग लागून यात चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लिक्विड मेटलचे उत्पादन करणाऱ्या कोरेक्स-2 प्लांटमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते.
कंपनीत लागलेली आग प्लॅटफॉर्मपासून लिफ्टपर्यंत पसरली. यावेळी लिफ्टमध्ये अडकलेले चार कर्मचारी गंभीर भाजले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युनिट रीस्टार्ट होत असताना या प्रक्रियेदरम्यान ही घटना घडली. आगीत होरपळलेले चारही जण कंत्राटी कामगार होते. आगीची माहिती मिळताच हजीरा पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवायला सुरवात केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List