आलिया – रणबीरच्या 35 कोटींच्या घरातील सिंपल किचन, Unseen फोटो व्हायरल
Alia Bhatt – Ranbir Kapoor Home: झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींचं आयुष्य फार वेगळं असतं. ते कायम स्वतःचं खासगी आयुष्य गुपित ठेवणय्याचा प्रयत्न करत असतात. पण सोशल मीडियाच्या काळात सेलिब्रिटींच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेणं फार सोपं झालं आहे. पण असं असताना देखील सेलिब्रिटीची खासगी गोष्टी गुपित ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. पण आता अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरातील किचनमधील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कपल आलिया आणि रणबीर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता आलिया आणि रणबीर त्यांच्या किचनमधील काही फोटो व्हायरल होत असल्यामुळे चर्चेत आले आहेत. सर्वत्र आलियाच्या घरातील किचनची चर्चा रंगली आहे.
कसे व्हायरल झाले आलिया – रणबीर यांच्या किचनमधील फोटो?
सांगायचं झालं तर, आलियाने घरात एक कुक ठेवला. त्या कुकने रिल तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केली. पण रिल आलिया – रणबीर यांच्या किचनमधील असल्याचं समजताच डिलिट करण्यात आली. पण सध्या रिलचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोमध्ये दिसत आहे की, किचनमध्ये फ्रिजवर आलिया – रणबीर आणि आलिया यांचा स्केच लावला आहे. तर फ्रिजला स्टिकर देखील चिटकवले आहेत. किचर फारच सिंपल असल्याचं चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या मुंबईच्या पाली हिल येथील आलिशान घरात लेक राहा कपूर हिच्यासोबत राहत आहे. जेव्हा आलिया – रणबीर यांनी लग्न केलं होतं, त्याआधी म्हणजे 2022 वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी मिळून 35 कोटी रुपयांचं घर घेतलं होतं. ज्या बिल्डिंगमध्ये दोघांचं घर आहे, त्याचं नाव ‘वास्तू’ असं आहे. याच घरात आलिया – रणबीर यांचं लग्न झालं.
आलिया – रणबीर यांचा आलिशान बंगला…
मुंबई येथील वांद्रे याठिकाणी रणबीर कपूर आणि आलिया भट्टन यांचा आलिशान बंगला तयार होत आहे. रिपोर्टनुसार, बंगला उभारण्यासाठी रणबील – आलिया यांनी तब्बल 250 कोटी रुपये मोजले आहेत. बंगल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. रणबीर आणि आलिया लवकरच लेक राहा हिच्यासोबत बंगल्यात शिफ्ट होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List