व्यावसायिक भेटीसाठी इराणला गेला तो परतलाच नाही, पतीच्या शोधासाठी पत्नीची मदतीची याचना
व्यावसायिक भेटीसाठी इराण गेलेला नांदेडचा तरुण 24 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पतीचा शोध घेण्यासाठी पत्नीने पोलिसांसह राजकीय नेत्यांकडे मदतीची याचना केली आहे. योगेश उत्तमराव पांचाळ असे बेपत्ता तरुणाचे नाव असून तो पेशाने इंजिनिअर आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील मूळचा रहिवासी असलेला उत्तम सध्या नांदेडच्या सिडको परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहे. योगेश हा पेशाने इंजिनिअर असून काही दिवसापूर्वीच त्याने श्रीयोग एक्सपोर्ट नावाने स्वतःची इम्पोर्ट-एक्सपोर्ट कंपनी सुरू केली आहे.
व्यावसायाच्या अनुषंगाने त्याने इराणमधील सादिक यांच्या कंपनीची माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी योगेश हा 15 दिवसांचा व्हिसा घेऊन इराणला गेला.
5 डिसेंबर रोजी योगेश मुंबईहून इराणला रवाना झाला. इराणला रवाना होण्यापूर्वी योगेशने व्हिडिओ कॉलमार्फत सादिकशी संपर्कही केल्याचे पत्नीने सांगितले. इराणला पोहचल्यानंतर योगेशने पत्नी आणि मुलांशी संपर्कही केला. मात्र त्यानंतर 7 डिसेंबरपासून त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
योगेश 11 डिसेंबर रोजी परतीचा प्रवास करणार होता. मात्र त्या दिवशी योगेश विमानात बसलाच नाही असे चौकशीतून समोर आले आहे. 24 दिवस झाले तरी अद्याप योगेशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे कुटुंबीय चिंतेत असून त्यांनी मदतीसाठी पोलीस आणि राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List