नवीन वर्षाचे स्वागत व रक्तदानाने सरत्या वर्षाला निरोप, 175 रक्तदात्यांनी रक्तदान करत केला थर्टी फस्ट साजरा

नवीन वर्षाचे स्वागत व रक्तदानाने सरत्या वर्षाला निरोप, 175 रक्तदात्यांनी रक्तदान करत केला थर्टी फस्ट साजरा

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत पंढरपुरात विधायक पद्धतीने करण्यात आले. तब्बल 175 रक्तदात्यांनी रक्तदान करून थर्टी फर्स्ट साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले. श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपुरकर मित्र परिवाराच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून रक्तदानाची चळवळ थर्टी फर्स्ट रोजी चालवली जाते.

श्याम गोगाव आणि माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांच्या एन आय टी मित्र परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी थर्टी फर्स्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदाच्याही वर्षी थर्टी फर्स्ट दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली. तब्बल 175 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रासह भेट देण्यात आली.

रक्तदान केल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील 48 तास कुठल्याही प्रकारचे व्यसन अथवा मद्य घेता येत नाही. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या दिवशी पार्टी, डीजे अशा गोष्टींना फाटा देत विधायक पद्धतीने व्यसनमुक्त पिढी घडवण्याचा संकल्प श्याम गोगाव आणि आदित्य फत्तेपूरकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी शतकवीर रक्तदाते रवींद्र भिंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी उप नगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या हस्ते झाले. तर युवक नेते प्रणव परिचारक यांनी शिबिराला भेट दिली. तसेच राष्ट्रवादीचे सुधीर भोसले, सौदागर मोलक, एम. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिवसभरात विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळीनी या शिबिरास भेटी देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला यांचे सहकार्य लाभले.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री श्याम गोगाव, आदित्य फत्तेपूरकर, विठ्ठल कदम, बाहुबली गांधी, महेंद्र जोशी, धनंजय मनमाडकर, सत्यवान दहिवाडकर, गणेश पिंपळनेरकर, अमित करंडे, गणेश जाधव, अमोल आटकळे, संतोष शिरगिरे, दत्ता पवार, विशाल पावले आदी मित्रमंडळींनी परिश्रम घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप कोंडी केली, खटले दाखल केले, पक्ष सोडण्यासाठी दबाव… धंगेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांचा आरोप
रविंद्र धंगेकर हे सुरूवातील शिवसेनेमध्ये होते, नंतर ते मनसेत गेले, पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि काल त्यांनी एकनाथ शिंदे गटात (...
‘तारक मेहता..’ फेम बबिताजी वयाच्या 37 व्या वर्षी सिंगल का? कारण वाचून व्हाल थक्क!
‘छावा’ने कमालच केली..; महिना होत आला तरी थिएटरमध्ये विकी कौशलचाच दबदबा
‘उदित की पप्पी…’, Kiss विवादावर उदित नारायण यांनी सोडलं मौन; म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी…’
रवीना टंडनच्या लेकीचं दुसऱ्या धर्मात लग्न; भडकले नेटकरी
मजुरांची टंचाई; शेतकरी मेटाकुटीला, बटाटा काढणीसाठी मजूर मिळेना
Pune crime news – शिरूरमधील कॅफेमध्ये तरुणाईची डिंगडांग