वाल्मिक कराड याची शरणागती ही फिक्सिंग – जितेंद्र आव्हाड
वाल्मीक कराड ताब्यात आला पण आका अजून बाहेरच आहे. महाराष्ट्राचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा आरोप झाले आणि संबंधित गुन्हा पुढे सरकला किंवा संबंधित मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर तो खुर्ची सोडून देतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून वाल्मीक कराड हा सरेंडर करणार होता, हे मी अगोदरच सांगितले होते. यापूर्वीच मी ट्विट केले असून हे सर्व प्रकरण सेट करण्यासाठी इतके दिवस घेतले आहेत. 19 दिवसांनंतर वाल्मीक कराड समोर हजर झाला पण तो फक्त खंडणीबद्दल बोलत आहे. हत्येबद्दल तो बोलत नाही. आत्ताच्या या प्रकरणात जे अधिकारी आहेत, त्यांनीच त्याला मदत केली. संपूर्ण बीडला माहिती होते की, तो आज येणार आहे. ओउण्यातील त्याच्या समर्थकांना माहिती होते, की आज राजे येणार आहेत. त्याप्रमाणे राजे आले आणि येताना माणसे घेऊन आले. ते फौजच घेऊन आले असून हे प्रकरण किती गंभीर आहे? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की,वाल्मीक कराडने सरेंडर करत पोलिसांना आव्हान दिले आहे की, तुम्ही काही नाही करू शकत, मीच तुमच्याकडे येत आहे. असे जर होत असेल तर राज्यव्यवस्था उधवस्त होईल. पोलिसांची भीती ही गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. तीच भीती जर गुन्हेगारांमध्ये उरली नाही तर मग कोणाला घाबरणार?” असे म्हणत विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर टिपण्णी केली. “302 चा गुन्हा वाल्मीक कराडवर अजिबात दाखल होणार नाही, कारण याचा बाप केबिनमध्ये बसला आहे. यांना किती माज आहे हे दाखवण्यासाठी मी चॅट उघड केले होते.” असा दावा यावेळी त्यांनी केला आहे. तसेच, जोपर्यंत वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत जनतेने शांत बसू नये, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, संतोष देशमुख हे भाजपचे होते आमच्या पक्षाचे नव्हते, पण माणुसकी जिवंत राहावी, यासाठी आम्ही लढतो आहोत. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सरकारी वकील देताना त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं आवश्यक आहे. माझी मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती आहे की, मागच्या दोन-तीन वर्षात झालेल्या हत्यांची चौकशी करावी आणि त्यांच्याही कुटुंबियांना बोलवून घ्यावं. त्यावेळी कळेल की कोणी कोणाची जमीन बळकावली आणि कोणी कोणाची हत्या केली.” असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे सांगितले.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची तुलना बिहारशी करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या जनतेला जोपर्यंत वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत जनतेने शांत बसू नये, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केलं.
जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एका प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, एक हत्या तर भयंकर आहे. त्याची माहिती माझ्याकडे आहे, पोरीला फोन लावून दिला गेला आणि फोनवरून मुलीला सांगितलं की एक तर तू गोळी मारून घे नाही. तर याला गोळी मारून घ्यायला सांग. याचा संपूर्ण तपशील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिला नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List