खो – खो वर्ल्ड कपची धावाधाव 13 जानेवारीपासून, पुरुष गटात 20 तर महिलांच्या गटात 19 संघांचा समावेश

खो – खो वर्ल्ड कपची धावाधाव 13 जानेवारीपासून, पुरुष गटात 20 तर महिलांच्या गटात 19 संघांचा समावेश

महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या मराठमोळ्या खो-खोने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून खो-खोचा पहिला वहिला वर्ल्ड कप येत्या 13 ते 19 जानेवारीदरम्यान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेत पुरुष गटात 20 तर महिला गटात 19 देशांचे संघ आपले कौशल्य दाखवतील.

गेली चार दशकांपासून खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राज्यातील खो-खोप्रेमी मेहनत घेत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून खो-खोच्या लीगनंतर खो-खोच्या वर्ल्ड कपचाही थरार रंगणार आहे. पुरुषांप्रमाणे महिलांचाही वर्ल्डकप आयोजित केला जाणार असून दोन्ही प्रकारांत संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून पुरुष गटात हिंदुस्थानचा संघ ‘अ’ गटात आहे. या गटात नेपाळसह पेरू, ब्राझील, भूतान या संघांनाही स्थान देण्यात आले आहे. महिलांच्या गटात हिंदुस्थानसह इराण, मलेशिया आणि दक्षिण कोरिया हे संघ खेळणार आहेत.

हिंदुस्थानची सलामी ब्राझीलशी

पुरुष गटात हिंदुस्थानचा सलामीचा सामना 14 जानेवारीला ब्राझीलशी होईल. त्यानंतर 15 जानेवारीला पेरूविरुद्ध तर 16 जानेवारीला भूतानविरुद्ध भिडेल. महिलांच्या गटात हिंदुस्थानी महिला 15 आणि 16 जानेवारीला अनुक्रमे इराण आणि मलेशियन संघाविरुद्ध भिडतील. स्पर्धेच्या प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत धडक मारतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जानेवारीला, 18 जानेवारीला उपांत्य फेरीच्या लढती खेळविल्या जातील आणि 19 जानेवारीला अंतिम सामना खेळला जाईल, अशी माहिती वर्ल्ड कप आयोजन समितीचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी दिली.

खो-खो विश्वचषकाची गटवारी (पुरुष)

  • अ गट – हिंदुस्थान, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
  • ब गट – द. आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलॅण्ड्स, इराण
  • क गट – बांगलादेश, श्रीलंका, द. कोरिया, अमेरिका, पोलंड
  • ड गट – इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया.

खो-खो विश्वचषकाची गटवारी (महिला)

  • अ गट – हिंदुस्थान, मलेशिया, इराण, द. कोरिया.
  • ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलॅण्ड्स.
  • क गट – नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
  • ड गट – द. कोरिया, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?