मी नाही त्यातली… शरण आलेल्या कराड यांच्यावर सुरेश धस यांचा निशाणा
बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणत फरार असलेला वाल्मीक कराड हा आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. शरण येण्याआधी वाल्मीक कराड याने एक व्हिडीओ जारी करत संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे, मी जर त्यात दोषी आढळलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे”, असे वाल्मीक कराड म्हणाला.
”या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अॅक्शनमुळे, दाखवलेल्या तत्परतेमुळे शेवटी सीआयडी समोर वाल्मीक कराड यांना समोर यावं लागलं. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आता त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यासासंदर्भात परवानगी मागितली आहे. या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये प्रॉपर्टी अॅटॅच केल्या पाहिजे. लवकरात लवकर यांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्याच पाहिजे त्याशिवाय यांचे आका जे अन्य गुन्हे करत होते ते उघडे पडणार नाहीत, असे धस म्हणाले.
वाल्मीक कराडने व्हिडीओतून केलेल्या दाव्यावर बोलताना सुरेश धस यांनी त्यांना टोला लगावला आहे, ”मी नाही त्यातली… असं सगळं आरोपी म्हणतच असतो. आता पोलीस, सीआयडी सगळं बघतील. सीआयडीचे टॉपचे अधिकारी तपास करत आहेत. प्रॉपर्टी अॅटॅचची भीती, घरादारापर्यंत पोलीस पोहोचले. इतरप ठिकाणी उचला उचली व्हायला लागली. शेवटी माणून किती दिवस तग धरणार. त्यामुळे ते शरण आले ते काही स्वखुशीने आलेले नाही, असेही धस म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List