परभणी असो की बीड राज्याला लागली दहशतीची कीड! विधानभवन परिसरात घोषणा देत विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षांनी महायुती सरकारला धारेवर धरले. विधानभवन परिसरात विरोधी पक्षांनी परभणी आणि बीडच्या प्रकरणावरून घोषणा देत सरकारचा धिक्का केला. परभणी आणि बीडच्या प्रकरणावर फलक हाती देत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आंदोलन केले.
गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो… अटक करा, अटक करा.. गुन्हेगारांना अटक करा… अशा घोषणा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्या. तर परभणी असो की बीड राज्याला लागली दहशतीची कीड… हत्येतील आरोपींचे साथीदार असंवेदनशील महायुती सरकार, सत्ता महायुतीची पाठराखण हत्येतील आरोपींची, खुन्याला वाचवलं-जनतेला फसवलं व्वा रे महायुती सरकार… असे फलक हाती घेऊन विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध केला.
परभणी आणि बीडमध्ये जो अत्याचार आणि अन्याय झाला. ज्या पद्धतीने सरकारने तिथे दमनगिरी केली, त्याविरोधात आमचं आंदोलन आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले. ईव्हीएम मशिनमधून निवडून आलेलं जे सरकार आहे, या सरकारने लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्या पद्धतीने दलितांचं कोंबिग ऑपरेशन करून मारहाण करून त्यात तरुणाचा मृत्यू झाला. एका सरपंचाला ज्या पद्धतीने मारलं आणि या पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याचं काम सरकारच्या वतीनं होत आहे, याच्या विरोधातला हा आवाज आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कार्यकर्त्या सहभागी झाला होता. तुरुंगात त्याचा मृत्यू झाला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पोलिसांनी ज्या प्रकारे अमानुष मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंश याला मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे. अशाच प्रकारे बीडमध्ये सरपंच देशमुख यांची हत्या झाली, या प्रकरणात अजित पवार गटाचे कार्यकर्ते सामील आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराड हा यात सामील आहे. बीड, परभणीच्या घटने थेट सरकार जबाबदार आहे. याविरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केले, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List