24 वर्षांनी कोर्टाची लढाई जिंकली अन् वयाच्या 66 व्या वर्षी LLB ला प्रवेश, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

24 वर्षांनी कोर्टाची लढाई जिंकली अन् वयाच्या 66 व्या वर्षी LLB ला प्रवेश, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

गुजरातमधील शशिकुमार मोहता यांच्या 24 वर्षांच्या लढाईला अखेर यश मिळाले आणि वयाच्या 66 व्या वर्षी LLB ला प्रवेश घेण्याचा त्यांचा मार्ग कोर्टाने खुला करून दिला. 2000 साली गुजरात युनिवर्सिटीच्या डीटी कॉलेजमध्ये LLB ला प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या शशिकुमार मोहता यांना कॉलेजने प्रवेश नाकारला होता. या विरोधात त्यांनी 2001 साली कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून 3 वर्षांसाठी LLB ला प्रवेश घेण्याची परवानगी याचिकाकर्ते शशिकुमार मोहता यांना देण्यात आली आहे. त्याच बरोबर याचिकाकर्ते शशिकुमार मोहता यांचा कायदेशीर खटल्याचा संपूर्ण खर्च उचलण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. कायद्याची पदवी प्राप्त करणे हे अहमदाबादच्या शशिकुमार मोहता यांचे स्वप्न होते. त्यासाठी 14 वर्षांचे औपचारिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. परंतु गुजरातमध्ये LLB ला प्रवेश घेण्यासाठी 15 वर्षांचे औपचारिक शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य होते. त्यामुळे डीटी लॉ कॉलेजने शशिकुमार मोहता यांना नियमामुसार प्रवेश नाकारला होता. याविरोधात शशिकुमार मोहता यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

शशिकुमार मोहता यांनी कोर्टामध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोलकातामध्ये पूर्ण झाले. तेव्हा कोलकातामध्ये 11+3 अशा शैक्षणिक पॅटर्न होता. त्यानुसार शशिकुमार मोहता यांनी 11 वर्ष शालेय शिक्षण आणि त्यानंतर 3 वर्ष वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली होती. शशिकुमार मोहता 1980 साली कोलकाताहून अहमदाबादमध्ये स्थलांतरीत झाले. त्यानंतर 2000 साली LLB ला प्रवेश घेण्यासाठी त्यांनी अर्ज केला असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर चविष्ट जेवण हवंय… आरोग्यही ठणठणीत हवंय? मग या गोष्टीचा आजच करा वापर
नारळाचे दूध फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याचे फायदे जाणून घेऊन तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे...
हॉटेलमध्ये बोलावलं अन्…, मी रात्रभर रडत होते; सात दिवस घरात कोंडून घेतलं, कपिल शर्माच्या ‘बुआ’नं सांगितला कास्टीग काउचचा अनुभव
मोहित कंबोज ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार, आमदार उत्तम जानकर यांचा दणका
दापोलीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी
लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सेलिब्रिटी बॉडीगार्डला…. सोनू सूदचा खुलासा
बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा, समोर आलं मोठं कारण
भुजबळ, पवारांचा एकाच गाडीतून प्रवास; शरद पवारांच्या पायाही पडले, माजी आमदाराच्या घरी दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?