लग्नात जेवण देण्यास उशिर केला, संतापलेल्या तरुणाने वेटरवर गोळी झाडली
हरियाणातील फरीदाबादमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. लग्नसमारंभात जेवण देण्यास उशिर केल्याच्या रागातून एका तरुणाने वेटरवर गोळी झाडली. यात वेटरचा मृत्यू झाला. फरीदाबादमधील सैनिक कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मयत वेटर आदर्श कॉलनीतील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. शुक्रवारी रात्री त्याला सैनिक कॉलनीतील एका समारंभात काम करण्यासाठी मालकाने पाठवले होते. मोहित नामक तरुण आपल्या मित्रांसह लग्नात जेवण करत होता. यावेळी त्याने वेटरला काही खाण्याचे पदार्थ आणण्यास सांगितले.
वेटरला पदार्थ आणण्यास उशिर झाल्याने मोहित आणि त्याच्या मित्रांनी त्याला शिवीगाळ सुरू केली. वेटरने यास प्रत्युत्तर दिल्याने मोहितने पिस्तुल काढली आणि वेटरच्या छातीत गळी झाडली. गंभीर अवस्थेत वेटरला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली. तपासानंतर दोन आरोपींना अटक केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List